झरेवाडी येथून बेपत्ता वृद्धेचा मृतदेह सापडला

रत्नागिरी:- तालुक्यातील झरेवाडी येथून बेपत्ता झालेल्या वृद्धेचा मृतदेह हातखंबा येथील सापडला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वनिता वसंत कळंबटे (वय ६५, रा. झरेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २५) दुपारी साडेतीनच्या सुमारास हातखंबा येथील शेतीफार्म कृषी नर्सरीच्या बाहेर कावळटे येथी निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वनिता या मंगळवारी (ता. १९) ला घरातून निघून गेल्या होत्या. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती. सोमवारी तिचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह हातखंबा येथील शेतीफार्म कृषी नर्सरीच्या बाहेर कावळटे येथे निदर्शनास आला.