Sunday, September 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार, कोकण बँकेचे संचालक आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले जावेद मुजावर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ते कोकण बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते. याशिवाय, त्यांनी एस.टी. महामंडळाच्या सेवेतून निवृत्ती पत्करली होती. पत्रकारितेची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध ‘केटीव्ही न्यूज’ वृत्तवाहिनीसाठी काही काळ पत्रकार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली होती. साप्ताहिकाचे संपादक, प्रकाशक म्हणून ते कार्यरत होते.  आपल्या शांत, प्रेमळ आणि दिलदार स्वभावामुळे त्यांनी सर्वच स्तरात जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी लांजा येथील मूळ निवासस्थानी पार पडणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.