जेवण करताना आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली

रत्नागिरी:- जेवण करण्यासाठी चुल पेटवत असताना रॉकेल ओतल्यानंतर आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. अक्षदा संतोष अंकुशराव (वय ४७, रा. किरबेट साखरपा, ता. संगमेश्वर) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.१) सकाळी साडेसातच्या सुमारास किरबेट येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षदा अंकुशराव या सकाळी साडेसातच्या सुमारास चुलीवर जेवण बनविण्यासाठी चूल पेटवत होत्या लाकडे लावून त्यावर रॉकेल ओतून पेटवले असता आगीचा भडका उडून अंगावरील नॉयलॉनच्या साडीने पेट घेतला. यामध्ये त्या ६० टक्के भाजल्या उपचारासाठी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र-साखरपा येथे दाखल केले. पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपाचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या बाबत नोंद करण्यात आली आहे.