रत्नागिरी:- संस्कार महिला मंडळ संस्थेचा पोषण आहार वाटपात सावळ गोंधळरत्नागिरी: शहरातील शाळांना दुपारच्या सुट्टीत देण्यात येणाऱ्या पोषण आहार वाटपातील गोंधळ तिसऱ्या दिवशी हि कायम राहिला आहे. बुधवारी पालिकेच्या दामले विद्यालयात पहिल्याच दिवशी दुपारची सुट्टी संपल्यानंतर पोषण आहार आल्याने विद्यार्थी भुकेने व्याकुळ झाले होते. मात्र आलेल्या पोषण आहारही अपूरा असल्याने अनेक विद्यार्थी आहारापासून वंचित राहिले. ते उशिरापर्यंत आहाराची प्रतिक्षा करत होते. त्यामुळे पोषण आहाराचे उद्देश नेमका काय आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.संस्कार महिला मंडळ संस्थेकडून तब्बल दुसऱ्यांदा हा प्रकार झाल्याने त्यांच्यावर करवाई करण्याचा इशारा पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनिल पाटील यांनी दिला आहे.
रत्नागिरी शहरातील सर्व शाळांना शालेय पोषण आहार वाटपासाठी तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्याच्यामार्फत सोमवारी दि.१ आगस्टपासून शालेय पोषण आहार वाटपाचे काम सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी संस्कार महिला मंडळा मार्फत रा.भा.शिर्के प्रशालेत विद्यार्थ्यांना कच्चा भात दिल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे पालकांसह संस्था चालक आक्रमक झाले होते.शहरातील दामले विद्यालयात संस्कार महिला मंडळ शाहुवाडी, कोल्हापूर या संस्थेमार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. शाळेला दोन दिवस सुट्टी असल्याने बुधवारी पोषण आहार पुरविण्याचा संस्थेचा पहिलाच दिवस होता. दुपारी १.२० वाजता शाळेची सुट्टी सुरु झाली. त्यापुर्वी शाळेत पोषण आहार पोहचणे आपेक्षित होते. मात्र सुट्टी संपली तरीही शाळेत पोषण आहार पोहचला नाही. तर दुसरीकडे चिमुकले भुकेने व्याकुळ झाले होते. पोषण आहार मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी घरातून डब्बे आणले नव्हते. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उपाशी पोटी राहावे लागले. तर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आहार आला. मात्र तो अपूरा असल्याने अनेक विद्यार्थ्यांना उपाशीच राहवे लागले.या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे प्रशासन अधिकारी सुनिल पाटील यांनी तात्काळ दामले विद्यालयात धाव घेतली होती. त्यांनी संस्थेला तात्काळ आहार पुरविण्याची सुचना केली. मात्र अपूर्या आहारामुळे अनेक विद्यार्थी वंचित राहल्याने संस्कार महिला मंडळ संस्थेवर कारवाई करण्याचा इशारा सुनिल पाटील यांनी दिला आहे.