जेलनाक्यावरचे सिग्नल पुन्हा सुरू

रत्नागिरी:- शहरातील जेलनाक्यावरचे सिग्नल पुन्हा सुरू झाले आहेत. कडक उन्हामुळे वाहनधारकांच्या मागणीचा मान ठेवून सिग्नल यंत्रणा बंद ठेवली होती. कडाक्याचा उन्हाळा असल्याने वाहनधारकांनी लाल सिग्नलच्या वेळी थांबल्यानंतर उष्णतेचा त्रास होत होता. त्यामुळे सिग्नल बंद ठेवण्याची मागणी केली होती. महिनाभरानंतर जेलनाक्यावरील सिग्नल पुन्हा सुरू झाले आहेत.

मे महिन्यातील सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला आहे. सुट्ट्यांच्या मोसमात पर्यटकांसह चाकरमानी वाहनांनी रत्नागिरीत मोठ्या संख्येने येतात. अशा वेळी मुख्य रस्त्यावेळी वाहनांची रेलचेल कायम सुरू राहिल्यानंतर बायपास रस्त्यावरून मुख्य रस्त्यांवर येणाऱ्या आणि मुख्य रस्ता ओलांडून समोरच्या अंतर्गत रस्त्यांवर जाणाऱ्या वाहनांना फारवेळ वाट पाहावी लागते.