जेलनाका येथे दुचाकीची एसटीला धडक; स्वार जखमी

रत्नागिरी:- शहरातील जेलनाका येथे एसटी आणि दुचाकीच्या अपघातात स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिद्धेश रमेश कदम (वय २८, रा. राजेंद्रनगर, मारुती मंदिर, रत्नागिरी) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास जेलनाका येथील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश कदम हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एवाय १५२४) सोबत हर्षदा मोहित यांना घेऊन आठवडा बाजार ते मारुती मंदिर असा जात असताना एसटी (क्र. एमएच-१४ एलएक्स ७१३६) या बसला धडक झाली. यामध्ये सिद्धेश जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.