रत्नागिरी:- वारंवार त्रास देणाऱ्या व्यक्तीबाबत राजापूर पाेलीस स्थानकात तक्रार करुनही अद्याप काेणतीच कारवाई हाेत नसल्याची बाब समाेर आली आहे. अखेर न्यायासाठी काेतापूर येथील प्रकाश पुनाजी काेतापकर यांनी थेट जिल्हा पाेलीस अधीक्षकांचा दरवाजा ठाेठावला आहे. याबाबत दिलेल्या पत्रात त्यांनी संबंधित व्यक्तीकडून आपल्या जीवितास धाेका असल्याचे म्हटले आहे.
राजापूर तालुक्यातील काेतापूर – चर्मकारवाडी येथील प्रकाश काेतापकर हे आई, पत्नीसाेबत राहतात. त्यांच्या घरासमाेरच जितेंद्र नामक व्यक्ती राहत आहे. त्यांचा दारुचा व्यवसाय असून, दरराेज सायंकाळी दारु पिऊन ते प्रकाश काेतापकर व कुटुंबाला अश्लिल शिवीगाळ करत असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच काेयती घेऊन वारंवार जीवे ठार मारण्याची धमकीही देत आहेत. त्यांनी अनेकवेळा पाण्याच्या पाईप लाईन ताेडून पाण्यापासून वंचित ठेवण्याचाही प्रकार केला असल्याचे काेतापकर यांनी या पत्रात म्हटले आहे.
याबाबत प्रकाश काेतापकर यांनी तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत यांच्याकडे अर्ज केला आहे. तरीही त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही. अखेर त्यांनी राजापूर पाेलीस स्थानकातही अनेकवेळा तक्रार दिली आहे. मात्र, पाेलिसांनीही त्यांच्या अर्जाला केराची टाेपली दाखविली आहे. २००९पासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रकाश काेतापकर यांनी अखेर ८ डिसेंबर २०२१ राेजी जिल्हा पाेलीस अधीक्षक यांच्याकडे पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या व कुटुंबाच्या जीवितास धाेका असल्याचे म्हटले असून, न्याय देण्याची मागणी केली आहे.