रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना अधिसूचना आज, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या ग्राम विकास विभागाने १२ जून २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या अधिसूचनेनुसार, रत्नागिरी जिल्ह्याला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना प्राप्त झाली आहे, तर त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समितीच्या निर्वाचक गणांची रचना देखील निश्चित करण्यात आली आहे. ही नवीन रचना आगामी २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागू होणार आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रभाग रचनेचा अभ्यास करून इच्छूक उमेदवार आणि राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत. ही अंतिम प्रभाग रचना असल्याने यात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे पुढील काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. या अधिसूचनेची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. सर्वसामान्य नागरिक आणि संबंधित पक्ष याचा अभ्यास करू शकतात.









