रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 94 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 6 हजार 699 वर पोचला आहे. तसेच चोवीस तासात तब्बल आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या 217 वर पोचली आहे.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढतीच आहे. मागील चोवीस तासात रुग्णसंख्येत 94 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात आरटीपीसीआर टेस्ट केलेले 60 रुग्ण तर अँटिजेन टेस्ट केलेल्या 34 रुग्णांचा समावेश आहे.
नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यातील 2 रुग्ण, दापोली 2, खेड 3, गुहागर 13, चिपळूण 18, संगमेश्वर 13, रत्नागिरी 33, लांजा 5 आणि राजापूर तालुक्यात 5 रुग्ण सापडले आहेत. आता पर्यंत 38 हजार 901 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून 6 हजार 699 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
मागील 24 तासात तब्बल आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 217 वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये चिपळूण मधील 2 रुग्ण, खेड मधील 2, संमगमेश्वर 2, गुहागर 1 आणि रत्नागिरीतील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 63 तर चिपळूण तालुक्यात 51, खेड 37, दापोली 25 तर संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचे 19 बळी गेले आहेत.