जिल्ह्यात 800 जोडप्यांनी निवडला ‘समलिंगी’ विवाहाचा पर्याय

रत्नागिरी:- समलैंगिकतेला न्यायालयानेसुद्धा त्याला मान्यता दिल्याने समलिंगी विवाह करणार्‍यांची संख्याही आता वाढत आहे. जिल्ह्यात एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार 800 जोडप्यांनी समलिंगी विवाहाची निवड केली आहे. ही आकडेवारी अजब वाटणारी असली तरी सध्याच्या तरुण पिडीचा कल वेगळ्या वळणावर असल्याचे यातून समोर येत आहे. 

भारत सरकारच्या एका सर्वेक्षणानुसार भारतामध्ये एकूण 25 लाख लोकं समलैगिक आहेत. पूर्वी समलैगिकता हा गुन्हा होता. कलम 377 नुसार हा गुन्हा सिद्ध झाल्यास दंड ठोठवण्यात येत होता व गुन्हेगारांना दहा वर्षे शिक्षाही दिली जात होती. मात्र अलिकडेच भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलैगिकतेवर एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार आता समलैंगिकता हा गुन्हा नसून त्याला न्यायालयाची मान्यता आहे.

समलैंगिकतेला समाजामध्ये मान्यता मिळवून देण्यासाठी आजवर अनेक कलाकारांना, दिग्दर्शकांना व निर्मात्यांना खूप अभ्यासपूर्ण हा विषय हाताळावा लागला आहे. मात्र कलम 377 अंतर्गत जेव्हा हा गुन्हा होता तेव्हा यासाठी संघर्षही करावा लागला होता. 1996-98 च्या दरम्यान दिग्दर्शक दिपा मेहता यांनी शबाना आझमी व नंदिता दास यांचा फायर हा सिनेमा दर्शकांच्या समोर आणून या सिनेमाच्या माध्यमातून समाजासमोर समलैगिकता या विषयावर जागृता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या गर्लफ्रेण्ड या चित्रपटातून दोन मुलींमधील समलैंगिता संबंधांवर भाष्य करण्यात आले आहे. तसेच सत्य घटनेवर आधारीत असणारा मनोज वाजपेयी यांच्या अभिनयातील अलिगड हा सिनेमासुद्धा फार गाजला होता.

जिल्ह्यात शेकडो समलैंगिक विवाह झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामध्ये फक्त 800 अधिकृत जोडप्यांनी एका खाजगी संस्थेकडे नोंदणी केली आहे. मात्र हे प्रमाण अधिकृत असून अनधिकृतसुद्धा समलैंगिक असणार्‍यांची संख्या जास्त आहे.जिल्ह्यात समलैंगिक विवाह करणार्‍यांची संख्या वाढत आहे. केंद्रशासन पुरस्कृत महिला व बालविकास विभागांतर्गत ‘सखी वन स्टॉप’ सेंटरची स्थापना जिल्ह्यात करण्यात आली आहे. यामध्ये कौंटुंबिक हिंसाचार, बलात्कारपिडित, लैंगिक शोषण अशा तक्रारी आल्यास त्यांचे निराकरण केले जाते. तसेच मोफत समूपदेशनही केले जाते. या सेंटरमध्ये समलैंगिक दोन जोडप्यांनी तक्रार केली आहे. सध्या त्यांचे समुपदेशन सुरू असल्याचे सेेंटरतर्फे सांगण्यात आले.