रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 191 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून पर्यंत कोरोनाने 339 बळी घेतले आहेत.
मागील 24 तासात नव्याने 7 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 367 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 191 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 63 हजार 362 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 3 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 896 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा बळी घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 339 वर पोचली आहे. जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.97 टक्के आहे.