जिल्ह्यात 655 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या 45 हजारापार 

रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 578 तर त्यापूर्वीचे 77 असे एकूण 655 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 352 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 226 तर यापूर्वीच्या 77 पॉझिटिव्ह अहवालांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 45 हजार 313 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आज 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या सोमवारी 429 तर मंगळवारी 567, बुधवारी 525, गुरुवारी 538, शुक्रवारी 683, शनिवारी 426, रविवारी 484, सोमवारी 488 रुग्ण सापडले होते. नव्याने 655 रुग्ण सापडले  असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 532 पैकी 352 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 2 हजार 988 पैकी 226 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 45 हजार 313 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 5 हजार 525 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 578 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

जिल्ह्यात मागील चोवीस तासात 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 1 हजार 545 जणांचे कोरोनाबळी गेले आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर 3.40 टक्क्यांवर आहे. रत्नागिरी तालुक्यात आज 8 तर आतापर्यंत सर्वाधिक 458 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.