जिल्ह्यात 41 पॉझिटिव्ह रुग्ण; 2 मृत्यूची नोंद 

रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 1024 तपासण्यांमध्ये केवळ 41 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 48 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने 3 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 48 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 69 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.26 टक्के आहे. नव्याने 41 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 216 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 524 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 318 तर संस्थात्मक विलगीकरणात 228 रुग्ण उपचार घेत आहेत.