रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि कॉलेज 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्यांच्या माध्यमातून धडे दिले जाणार असले तरी जिल्ह्यात 35 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी केवळ मोबाईल नसल्याने शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याशिवाय दुर्गम भागात रेंज नाही इतर सुविधा नाहीत यामुळे हा आकडा 50 टक्क्यांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये यंदा सुमारे 73 हजाराहून अधिक विद्यार्थी समाविष्ट होणार आहेत. शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात 28 हजार विद्यार्थ्यांकडेच ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची सुविधा आहे. काही विद्यार्थ्यांनी शेजार्यांच्या मोबाईलचा उपयोग केला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु करता यावे यासाठी शिक्षकच त्यांच्यापर्यंत अभ्यास घेऊन पोचत आहेत. अनेक दुर्गम भागात तर रेंज नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात आहेत.