रत्नागिरी;- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार वाढत असून डेल्टा प्लसचे बाधितांचीनाही नोंद झाली आहे; मात्र लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण मोहीमेला वेग आलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात लसीकरण झालेल्यांची संख्या 3 लाख 81 हजार असून 80 हजार 335 जणांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. दुसर्या डोस घेणार्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे.
जिल्ह्यात सध्या दिवसाला पाचशेच्या सरासरीने बाधित सापडत आहेत. गावगावात पसरलेल्या कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. लसीकरण हा एकमेव पर्याय असला तरीही तुटवड्यामुळे त्यालाही मर्यादा आलेल्या आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या 16 लाखाच्या दरम्यान आहे. त्यातील काहीजणं नोकरीनिमित्त परजिल्ह्यात रवाना झालेले आहेत. सध्या लसीकरणासाठी जिल्ह्यात 132 केंद्रे निश्चित केली आहेत. लोकसंख्येच्या तुलनेने आठवड्यातून दोनवेळा 7 ते 10 हजार एवढीच लस मिळत आहे. त्यामुळे केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. अतिगंभीर रुग्णांसाठी आवश्यक आरोग्य यंत्रणेची वानवा, लशींचा तुटवडा आणि तिसर्या लाटेचे आव्हान असतनाच डेल्हा प्लसची नोंदही जिल्ह्यासाठी अडचणीची ठरलेली ओह.
कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हे प्रभावी अस्त्र असूनही 10 लाख 33 हजार नागरिकांना अद्याप पहिलाही डोस मिळालेला नाही. रत्नागिरी तालुक्याचे आणि जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे रत्नागिरी शहरात लसीचा पुरवठा अधिक प्रमाणात झाला. त्यामुळे या तालुक्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. 29 जूनअखेर रत्नागिरी तालुक्यातील 15 शासकीय आणि दोन खासगी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण 57 हजार 937 इतकी लस देण्यात आली. मंडणगड तालुक्याची लोकसंख्या कमी असल्याने त्या तुलनेने या तालुक्यातील 5 केंद्रांवर 2,770 जणांनी लस घेतली. जिल्ह्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या केवळ 80 हजार 549 आहे. तर 3 लाख लोकांनी पहिला डोस घेतला आहे.