रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 248 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर केवळ 32 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस रुग्ण सावडण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने घटत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 32 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 248 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 46 हजार 865 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी 26 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 8 हजार 321 पैकी 7 हजार 678 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 92.27 टक्के आहे. मागील चोवीस तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आता पर्यंत जिल्ह्यात 310 जणांचा मृत्यू झाला आहे.