जिल्ह्यात 24 तासात 7 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 575 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात आणखी एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही. 

मागील 24 तासात नव्याने 7 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 547 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 575 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 71 हजार 865 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 19 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 84 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 348 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 95.15 टक्के आहे.