जिल्ह्यात 24 तासात 65 नवे कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 65 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 631 वर पोचली आहे. मागील चोवीस तासात चिपळूण येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 270 वर पोचली आहे. 

नव्याने सापडलेल्या 65 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 39 जण आरटीपीसीआर तर 26 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. सर्वाधिक 29 रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील तर चिपळूण तालुक्यात 15 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय खेड 3, संगमेश्वर 10, गुहागर 4, राजापूर 1 आणि लांजा तालुक्यात 3 रुग्ण सापडले आहेत. 
 

चोवीस तासात 199 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत 37 हजार 074 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज 83 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 6 हजार 538 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 85.67 टक्के आहे. तसेच जिल्ह्याचा मृत्युदर 3.53 टक्क्यांवर पोचला आहे.