रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 567 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी याच काळात एक दिवस वगळता सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात पाचशेवर रुग्णसंख्येची नोंद झाल्याने चिंतेचा विषय ठरत आहे. 567 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 41 हजार 196 झाली आहे.
मागील 24 तासात तब्बल 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 399 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 413 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 276, खेड 135, गुहागर 102, दापोली 122, संगमेश्वर 167, लांजा 73, राजापूर 99 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.39% आहे.
जिल्ह्यात गेल्या सोमवारी 395 तर मंगळवारी 655, बुधवारी 610, गुरुवारी 389 तर शुक्रवारी 590, शनिवारी 582, रविवारी 567 तर सोमवारी 429 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मंगळवारी रुग्णसंख्या 41 हजारापार पोचली आहे. नव्याने 567 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1 हजार 717 पैकी 270 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 968 पैकी 297 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.