जिल्ह्यात 24 तासात 499 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढण्याचे प्रमाण सुरूच आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 499 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 199 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 300 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 499 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 23 हजार 302 झाली आहे. जिल्ह्यात आज तब्बल 20 मृत्यूची नोंद झाली आहे.

मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. नव्याने आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात 499 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 23 हजार 302 जाऊन पोहचली आहे. रविवारी आलेल्या अहवालात 199 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 300 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

जिल्ह्यात आज 20 मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 681 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 2.92% आहे. जिल्ह्यातील गेल्या 24 तासात सापडलेल्या 499 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 174, दापोली 32, खेड 65, गुहागर 51, चिपळूण 73, संगमेश्वर 51, राजापूर 25 आणि लांजा तालुक्यात 28 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 15.18% आहे.