जिल्ह्यात 24 तासात 486 पॉझिटिव्ह रुग्ण; रुग्णसंख्या 30 हजार पार

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 486 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 205 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 281 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 1909 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवे 486 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 30 हजार 336 झाली आहे. जिल्ह्यात 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात गुरुवारी 481, शुक्रवारी 512, शनिवारी 502 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 486 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 205 रुग्ण आरटीपीसीआर तर 281 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 30 हजार 336 वर जाऊन पोहचली आहे. 

 मागील 24 तासात 1909 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 842 जणांपैकी 637 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 553 पैकी 1272 निगेटिव्ह आले आहेत. आज जिल्ह्यात 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 915 जणांचा कोरोनामुळे बळी झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.01% आहे.