जिल्ह्यात आज तब्बल 36 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 450 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 283 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 167 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 2080 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवे 450 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 32 हजार 072 झाली आहे. जिल्ह्यात आज तब्बल 36 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 252 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात सोमवारी 259, मंगळवारी 345, बुधवारी 343 तर गुरुवारी 339 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 450 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 283 रुग्ण आरटीपीसीआर तर 167 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 32 हजार 072 वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण 17.07% आहे.
मागील 24 तासात 2080 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1018 जणांपैकी 735 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1512 पैकी 345 निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 36 मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 1028 बळी गेले आहेत. गेल्या चोवीस तासांत 252 जण कोरोनामुक्त झाले आहेत.









