जिल्ह्यात 24 तासात 429 पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण 22 जणांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात सापडणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या स्थिर आहे. मागील 24 तासात 429 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. चौथ्या दिवशी रुग्णसंख्या पाचशेपेक्षा खाली आहे. जिल्ह्यात एकूण 22 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नव्याने 429 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 40 हजार 629 झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या शनिवारी 494, रविवारी 508 तर सोमवारी 395, मंगळवारी 655, बुधवारी 610, गुरुवारी 389 तर शुक्रवारी 590 तर शनिवारी 582, रविवारी 567 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. नव्याने 429 रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 2 हजार 147 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 1 लाख 87 हजार 575 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

24 तासात 552 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून आतापर्यंत 34 हजार 764 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे हिण्याचे प्रमाण 85.56 टक्के आहे. जिल्ह्यात यापूर्वीचे 13 तर 24 तासातील 9 अशा 22 मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यू प्रमाण 3. 39 टक्के आहे.