रत्नागिरी:- गुरुवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 395 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. तर त्यापूर्वीच्या 30 अशा एकूण 425 रुग्णांची नोंद आहे. एकूण 4 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 65 हजार 449 झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 395 तर यापूर्वीचे 30 असे एकूण 425 रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणी केलेले 215 तर अँटीजेन चाचणी केलेले 180 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. नव्याने 425 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 65 हजार 449 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 9.41 टक्के आहे.
गुरुवारी 4 हजार 649 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 4 लाख 21 हजार 473 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 24 तासात 204 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता पर्यंत 57 हजार 871 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर 88.42 टक्के आहे. जिल्ह्यात नव्याने 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.81 टक्के इतका आहे.