रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 345 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 216 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 129 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 886 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवे 345 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 30 हजार 940 झाली आहे. आज जिल्ह्यात 14 मृत्यूंची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात शनिवारी 502, रविवारी 486 तर सोमवारी 259 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 345 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 216 रुग्ण आरटीपीसीआर तर 129 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 30 हजार 940 वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण 17.20% आहे.
मागील 24 तासात 886 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 659 जणांपैकी 443 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 572 पैकी 443 निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आज 14 मृत्यूंची नोंद झाली आहे आतापर्यंत एकूण 944 कोरोना बळी गेले असून मृत्यूदर 3.05% आहे.