जिल्ह्यात 24 तासात 279 नवे कोरोना बाधित;  6 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 279 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर सहा रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

नव्याने 279 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 72 हजार 927 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यँत 68 हजार 723 रुग्ण बरे झाले आहेत. तर 24 तासात 278 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. नव्याने 6 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 6 पैकी 24 तासातील 2 त्यापूर्वीचे 4 असे 6 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 135 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.93 तर रिकव्हरी दर 94.24 टक्के आहे. सद्यस्थितीत लक्षण नसलेले 1 हजार 369 तर लक्षण असलेले 397 रुग्ण आहेत.