रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 247 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर यापूर्वीचे 6 आणि 24 तासातील 3 अशा नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. नऊ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांचा आकडा 1 हजार 938 इतका झाला आहे.
नव्याने 247 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 67 हजार 976 रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासात 4 हजार 82 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 4 लाख 56 हजार 178 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
24 तासात 59 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 62 हजार 398 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 91.79 टक्के आहे. नव्याने 9 मृत्यू झाले असून मृत्यूचे प्रमाण 2. 87 टक्के आहे.









