रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना उपचाराखाली असणारे रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील 24 तासात 24 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 576 जणांचा मृत्यू झाला आहे.
24 पैकी सर्वाधिक 5 मृत्यू चिपळूण तालुक्यात झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यात 4, दापोली 4, रत्नागिरी तालुक्यात 4, राजापूर 4 आणि लांजा तालुक्यात 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर गेल्या काही दिवसात वाढून 2.99% झाला आहे.