जिल्ह्यात 24 तासात 2 हजार 233 अहवालांमध्ये 53 जण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 2 हजार 233 जणांचा अहवाल प्राप्त झाला. यापैकी केवळ 53 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 57 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 73 हजार 465 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.27 टक्के आहे. नव्याने 53 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 114 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने 2 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 376 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.08 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 462 तर संस्थात्मक विलीकरणात 433 रुग्ण उपचार घेत आहेत. 24 तासात 2 हजार 180 अहवाल निगेटिव्ह आले असून आता पर्यंत 7 लाख 12 हजार 973 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.