रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात केवळ 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 476 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 365 बळी घेतले आहेत.
मागील 24 तासात नव्याने 19 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 974 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 476 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 80 हजार 595 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 20 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 445 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा बळी गेलेला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 365 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.70 टक्के आहे.