जिल्ह्यात 429 नवे बाधित रुग्ण; एकूण 8 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:-बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 429 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. तर एकूण 8 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 65 हजार 24 झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 279 तर यापूर्वीचे 150 असे एकूण 429 रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणी केलेले 116 तर अँटीजेन चाचणी केलेले 163 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. नव्याने 429 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 65 हजार 24 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 8.46 टक्के आहे.
बुधवारी 5 हजार 485 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 4 लाख 16 हजार 824 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 24 तासात 486 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता पर्यंत 57 हजार 667 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर 89.02 टक्के आहे.
जिल्ह्यात नव्याने 8 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात 24 तासात 6 तर यापूर्वीचे 2 अशा आठ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.82 टक्के इतका आहे. जिल्ह्यात गृहवीलगिकरणात 2 हजार 208 तर संस्थात्मक विलीगिकरणात 2 हजार 697 जण उपचार घेत आहेत.