जिल्ह्यात 24 तासात पुन्हा 78 कोरोना बाधित रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 78 नवे पॉझिटिव्ह तर तीन दिवसात 259 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 78 पैकी 64 जण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 14 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत.  मागील काही दिवसांपासून वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. 

पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक असून गुरुवारी जिल्ह्यात 78 नव्या रुग्णांची भर पडली. मंगळवारी जिल्ह्यत 94, बुधवारी 87 तर गुरुवारी 78 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 11 हजार 107 वर जाऊन पोहचली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात 64 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 14 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.जिल्ह्यात आज 405 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 100691 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

चोवीस तासात 45 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10 हजार 150 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 91.38 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 377 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.39 % आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 78 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 20, दापोली 12, खेड 5, गुहागर 3, चिपळूण 16, मंडणगड 7, राजापूर 3, लांजा 1 आणि संगमेश्वर तालुक्यात 11 रुग्ण सापडले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 9.93% आहे.