जिल्ह्यात 24 तासात तब्बल 82 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 24 तासात 1 हजार 139 अहवालांमध्ये तब्बल 82 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 231 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 8 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 76 हजार 671 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.57 टक्के आहे. नव्याने 82 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 394 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 171 तर संस्थात्मक विलगीकरणात 60 रुग्ण उपचार घेत आहेत.