जिल्ह्यात 24  तासात तब्बल 33 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:- मागील चोवीस तासात तब्बल 33 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अलीकडच्या पंधरवडय़ात एका दिवसात एवढ्या मोठ्याप्रमाणात रुग्ण सापडण्याची पहिलीच वेळ आहे. याच कालावधीत 202 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 
 

नव्याने 33 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 043 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 202 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 57 हजार 844 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 87 रुग्ण उपचाराखाली आहेत. 

चोवीस तासात 16 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 584 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.92 टक्के आहे मागील चोवीस तासात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बळींची संख्या 327 झाली आहे. मृतांमध्ये चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

मागील चोवीस तासात सापडलेल्या 33 रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीत 9 तर अँटिजेन चाचणीमध्ये 24 जणांचा समावेश आहे. आज  रत्नागिरी 10, दापोली 10, खेड 1, गुहागर 1, चिपळूण 7 आणि लांजा तालुक्यातील 4 रुग्ण आढळून आले आहेत.