रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 207 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात दोन रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 362 बळी घेतले आहेत.
मागील 24 तासात नव्याने 27 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 856 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 207 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 77 हजार 250 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 7 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 315 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने दोघा रुग्णाचा बळी गेला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 362 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.51 टक्के आहे.