जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे पाच बळी; 45 नवे पॉझिटीव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 282 वर पोचली आहे. तर जिल्ह्यात आज 45 कोरोना बाधित सापडले आहेत. यानंतर कोरोना बाधितांची एकूण  संख्या 7 हजार 759 झाली आहे.

मृत्यू झालेल्या पाच रुग्णांमध्ये तब्बल तीन रुग्ण हे संगमेश्वर तालुक्यातील आहेत. याशिवाय खेड आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत सर्वाधिक 76 बळी रत्नागिरी तालुक्यात गेले आहेत. याशिवाय चिपळूण 68, खेड 46, गुहागर 10, दापोली 31, संगमेश्वर 27, लांजा 10, राजापूर 12 आणि मंडणगड तालुक्यात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.