रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात केवळ 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 264 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 351 बळी घेतले आहेत.
मागील 24 तासात नव्याने 7 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 606 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 264 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 73 हजार 235 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 17 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा बळी गेलेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 351 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 95.00 टक्के आहे.