रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील चोवीस तासात केवळ 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 552 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही.
नव्याने 10 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 663 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 552 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 52 हजार 806 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात तब्बल 25 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 186 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 319 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.49 टक्के आहे.









