जिल्ह्यात 24 तासात अवघे 8 पॉझिटिव्ह रुग्ण; पाच मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 936 तपासण्यांमध्ये केवळ 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 50 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने 5 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 24 तासात 50 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 553 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.67 टक्के आहे. नव्याने 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 360 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 532 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 54  तर संस्थात्मक विलगीकरणात 196 रुग्ण उपचार घेत आहेत.