रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 184 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनाने 334 बळी घेतले आहेत.
मागील 24 तासात नव्याने 16 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 322 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 191 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 61 हजार 570 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 3 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 851 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 334 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.94 टक्के आहे.









