जिल्ह्यात 1 हजार 24 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये; नव्याने 222 बाधित तर 3 मृत्यू 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा दोनशे पार गेला आहे. 24 तासात 1 हजार 719 अहवालांमध्ये तब्बल 222 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना उपचाराखाली असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 313 ऍक्टिव्ह रुग्ण असून यापैकी 1 हजार 34 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 78 हजार 730 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  95.31 टक्के आहे. नव्याने 222 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 82 हजार 601 इतकी झाली आहे. 

नव्याने तीन मृत्यूची नोंद करण्या आल्याने आतापर्यंत 2 हजार 501 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 1 हजार 34 तर संस्थात्मक विलगीकरणात 279 रुग्ण उपचार घेत आहेत.