जिल्ह्यात 1 हजार 193 रुग्णांची कोरोनावर मात    

नव्याने 28 रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 1 हजार 774 

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 28 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 774 इतकी झाली असली तरी आतापर्यंत तब्बल 1 हजार 193 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 
 

दरम्यान शुक्रवारी 24 रुग्णांनी कोरोनावर मात केली. या रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड रुग्णालय येथील 6, समाज कल्याण 6, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 6, कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल  मधील 6 रुग्ण आहेत.  

नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 14 रुग्ण, कामथे येथील 14 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1 हजार 774 वर पोचली असून एकूण मृत्यूसंख्या 59 इतकी आहे. सद्यस्थितीत एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 522 इतके आहेत.