रत्नागिरी:- सर्वांत जास्त महसूल देणाऱ्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने यंदा उद्दिष्टापेक्षाही अधिक महसूल मिळवला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षांचे उद्दिष्ट ५५ कोटीएवढे होते. दस्त नोंदणीच्या माध्यमातून या विभागाने उद्दिष्टापेक्षाही जास्त ५८ कोटी २९ लाखएवढा महसूल मिळवला. यामध्ये ८ हजार ७५३ एवढ्या दस्तांची म्हणजे खरेदी-विक्रीची नोंद झाली आहे. सुमारे ११० टक्के या विभागाने उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
येथील नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी ५५ कोटीचे उद्दिष्ट आले होते. वर्षभरात विविध प्रकारचे ८ हजार ७५३ दस्तांची म्हणजे खरेदी-विक्रीची नोंद होऊन त्या द्वारे या विभागाला ५८ कोटी २९ लाखएवढा महसूल मिळवला आहे. म्हणजे या विभागाने या वेळी ११० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. यामध्ये जमीन, जागा, ब्लॉक, खरेदी-विक्री, कुळमुखत्यारपत्र, मृत्यूपत्र आदींचा यामध्ये समावेश आहे. आतापर्यंतची दस्तनोंदणीची पद्धत वर्षानुवर्षे दस्ताचा मजकूर तयार करून त्याची प्रिंट काढण्यात येते. दस्ताला लागणाऱ्या मुद्रांक शुल्काचे चलन काढून ते भरण्यात येते. दस्तासाठी आवश्यक अकृषक दाखला (एनए), सातबारा, प्रॉपर्टी दकार्ड, आधारकार्डसारखे विविध कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रेही जोडली जातात. वकिलामार्फत दुय्यम निबंधक कार्यालयांत प्रत्यक्षात दस्ताची नोंदणी करण्यात येते. त्यासाठी सुमारे अर्धा तास लागतो.
दस्तनोंदणीसाठी सध्या दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये टोकन पद्धती अस्तित्वात आहे. दिलेल्या टोकनच्या वेळेनुसार, दस्त नोंदणी करण्यासाठी पक्षकार, वकील कार्यालयात येतात. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते.
‘आय सरिता २.०’ या संगणक प्रणाली
पारंपरिक दस्तनोंदणीची पद्धत आता कालबाह्य होणार आहे. नव्याने बदल होणाऱ्या ‘आय सरिता २.० या संगणक प्रणालीमुळे दस्तनोंदणी अगदी सोपी होणार आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञानकेंद्राच्या मदतीने ही संगणकप्रणाली तयार करण्यात येत आहे. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर आता नवी ‘विंडो’ खुली होणार आहे.