जिल्ह्यात ५ आॕगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सोमवारपासून ५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत, असे अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहे.