जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या; रविवारी मतदान 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींना साठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. आता रविवारी सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी शनिवारी छुप्या प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. 

राज्यातील मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या. जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. प्रत्येक तालुक्यात प्रमुख पक्षांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी या पक्षांसह उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेबांची सेना प्रथमच आमने सामने आल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. 

मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी संध्याकाळी थंडावल्या असून आता रविवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. या निवडणुकीचा निकाल मंगळवार 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडिया सुद्धा प्रभावीपणे वापर प्रचारात करण्यात आला आहे. दुसरीकडे, पंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने प्रचारामध्ये प्रत्येक गावात महिलांचा सुद्धा मोठा सहभाग दिसून आला. शुक्रवारी अधिकृत प्रचार संपुष्टात आला असला तरी शनिवारी छुप्या प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होईल.