सर्वाधिक १३ अर्ज खेड तालुक्यातून, मंडणगड तालुक्यातून एकमेव अर्ज
रत्नागिरी:- प्रशासन आणि शासकीय यंत्रणांकडून आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच न्याय हक्कासाठी उपोषण आणि आंदोलन करणाऱ्यांची संख्या जास्त असते. ७९ व्या स्वातंत्र्यदिनी जिल्हाभरातून ५४ जणांनी आमरण उपोषण. तसेच आत्मदहनासंदर्भात जिल्हाप्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये खेड तालुक्यातून सर्वाधिक १३ जणांनी आंदोनल व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
स्वातंत्र्यदिन तसेच प्रजासत्ताक दिनी लोकप्रतिनीधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कांसाठी नागरिक
तसेच उपोषण तसेच आंदोलनाचा मार्ग अवलंबतात. शुक्रवारी होणाऱ्या स्वातंत्र दिनीही जिल्ह्यातून ५४ जणांनी आत्मदहन उपोषणाचा इशारा दिला आहे. यामध्ये सर्वाधिक उपोषण करणाऱ्यांची संख्या तालुक्यातील आहे. तर मंडणगड खेड तालुक्यातून फक्त एका महिलेने
आपले चोरी झालेले दागिने ७वर्षांनतरही पोलिसांना सापडत नसल्याबाबत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
संगमेश्वर तालुक्यातून ११, लांजा येथून ५ तर राजापूर आणि गुहागर तालुक्यातून २. गुहागरमधून २. दापोली तालुक्यातून ३, चिपळूण तालुक्यातून १० जणांनी आंदोलन आणि उपोषणांचा अर्ज दाखल झाले आहेत.
आर्जु टेक्सोलचे ग्राहक उपोषणावर ठाम
आर्जु टेक्सोल फसवणूक प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासंदर्भात ग्राहक व विलास वामन सुर्वे हे उपोषणाला बसणार आहेत. त्यांना इतर १५७ग्राहक पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.









