रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी वाढत्या मृत्यूने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने 36 मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासांमध्ये 15 आणि त्यापूर्वीचे 21 अशा 36 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या मृत्यू संख्येने प्रशासनासह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात मागील 24 तासात 15 तर त्यापूर्वीच 21 असे 36 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 36 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 1028 मृत्यू झाले आहेत. नव्याने झालेल्या 36 पैकी सर्वाधिक मृत्यू चिपळूण तालुक्यात 17 तर संगमेश्वर 3, रत्नागिरी 8, दापोली 1, गुहागर 2, लांजा 1, राजापूर 2 आणि खेड तालुक्यात 2 मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर 3.20 टक्क्यांवर पोचला आहे.









