जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी सहा रुग्णांचा मृत्यू

51 नवे बाधित; एकूण रुग्णसंख्या 6 हजार 954 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना संक्रमनाचा वेग कमी झाला असला तरी कोरोना बाधितांची वाढणारी मृत्यूसंख्या चिंतेत भर टाकणारी आहे. सलग दुसर्‍या दिवशी कोरोना बाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 237 वर पोचली आहे. याशिवाय जिल्ह्यात 51 नवे बाधित रुग्ण सापडले असून एकूण बाधितांची संख्या 6 हजार 954 इतकी झाली आहे. 
 

गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 51 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 19 रुग्ण आरटीपीसीआर तर 32 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. सापडलेल्या 51 रुग्णांपैकी खेड तालुक्यात 1, गुहागर 11, चिपळूण 7, संगमेश्वर 1, रत्नागिरी 18, लांजा 6 आणि राजापूर तालुक्यात 7 नवे रुग्ण सापडले आहेत. 
 

मागील 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात खेड मधील 2, संगमेश्वर 1, रत्नागिरी 1 आणि चिपळूण तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 237 जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात 69 झाले आहेत.