रत्नागिरी:- पावसाला पोषक वातावरण, ढगाळ हवामान झाल्याने कोकणात किमान तापमानात वाढ झाली आहे. अन्य विभागात पावसाची शक्यता असली तरी कोकणकिनारी भागात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. अन्य विभागात सुरू असलेला अवकाळी पाऊस उघडीप देण्याची शक्यता असल्याने तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे. त्याच परिणाम दोन चक्राकार वार्यांच्या स्थितीत झाला आहे. त्यामुळे काही भागात पाऊस तर काही भगात तापमानात वाढ असे मिश्र वातावरणआहे. दरम्यान, किनारी भगात उन्हाचा चटका वाढला असून, मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात 31.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी कमाल तापमान 34 अशांच्या पार होते. रत्नागिरीत किमान तापमान 18.3 अंश नोंदविले गेले. किमान तापमानाचा पारा कमी अधिक होत असून, तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.