जिल्ह्यात वाढला पावसाचा जोर; पुढील दोन दिवस जोरदार बरसणार

रत्नागिरी:- मागील दोन दिवस कमी जास्त प्रमाणात कोसळणाऱ्या पावसाचा जोर सोमवारपासून चांगलाच वाढला. सोमवारी सकाळपासून रत्नागिरीला पावसाने झोडपून काढले. पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑगस्ट महिन्यात रडतरखडत प्रवास करणारा मोसमी पाऊस महिन्याच्या अखेरीस जोरदार बरसला. शुक्रवारी रात्री पावसाने दमदारपणे ऑगस्ट महिन्याच्या समारोप केला तर शनिवारी आणि रविवारीही हलके सातत्य राखले होते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची वाटचाल किनारपट्टी भागात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 ते 5 सप्टेंबर हे तीन दिवस कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ‘महारेेन’च्या अहवालानुसार 108.55 टक्के पाऊस झाला आहे.

गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍याचा वेग वाढून किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. घाटमाथ्यावरही पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात अधून मधून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश भागात 3 ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याची वाटचाल मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 ते 5 सप्टेंबर हे तीन दिवस विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे

किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍याचा वेग वाढून किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. घाटमाथ्यावरही पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात अधून – मधून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.